वाशीम : राज्यस्तरीय सिलंबम चॅम्पियनशिप मध्ये वैष्णवी मानकर ने पटकाविले सुवर्ण पदक

वाशीम,पुढारी वृत्तसेवा :  नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या महाराष्ट्र राज्य सिलंबम चॅम्पियनशिप 2022 च्या स्पर्धा अहमदनगरमधील शिर्डी येथे संपन्न झाल्या. यामध्ये स्टिक फाईट या खेळामध्ये वाशिमच्या जऊळका येथील वैष्णवी मानकर हिने सिलंबम असोसिशन पुणेकडून उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकाविले.

शिर्डी मधील सिल्व्हर ओक लॉन येथे ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिलंबम स्टिक फाईट खेळामध्ये सुवर्ण पदक पटकावत वैष्णवी मानकर हिने वाशिम जिल्ह्याचे नाव उंचावले असून जउळका गावासाठी तिचे यश अभिमानास्पद आहे.

वैष्णवी हीचे शालेय शिक्षण जऊळका येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये झाले असून उच्च शिक्षण पुणे येथे झाले आहे. शिक्षणाबरोबरच खेळामध्ये आवड असणाऱ्या वैष्णवीने पुण्यातील सिलंबम असोसिएशन पुणे कडून स्टिक फाईट खेळामध्ये सुवर्ण पदक पटकाविले.वैष्णवीची आई सौ.संगीता संतोषराव मानकर  शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये  कार्यरत आहे. तर वडील संतोषराव ओंकारराव मानकर यांचे जउळका येथे पान सेंटर आहे. वैष्णवी मानकर हिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, भाऊ, मावसा – मावशी , काका -काकू, प्रशिक्षक श्रीधर कांबळे, पुंडलिक कचने,कोमल शिंदे,केशव मंगरूळ इत्यादींना दिले. या कामगिरीमुळे वैष्णवीचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

हेही वाचलंत का? 
Exit mobile version