अकोला : महाविद्यालयीन चार विद्यार्थी बेपत्ता | पुढारी

अकोला : महाविद्यालयीन चार विद्यार्थी बेपत्ता

अकोला; पुढारी वृत्तसेवा : एकाच महाविद्यालयातील तीन तरुण आणि एक तरुणी गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता आहेत. १ ऑगस्टला चौघेही घरातून कॉलेजला गेले ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. चौघेही व्याळा (ता.बाळापूर) येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत आहेत. याबाबतची तक्रार बाळापूर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल आहे.

बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. चार विद्यार्थी सोमवारी कॉलेजमध्ये गेले होते. मात्र, अद्याप ते घरी परतलेच नाहीत. तुळशी अनिल ताले (वय १८, रा. रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला), प्रतीक मनोहर तायडे (वय २१ रा. अडगाव बु. ता. तेल्हारा), प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय १९, रा.न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला) अशी बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे आहेत. बेपत्ता विद्यार्थी आढळल्यास तत्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याशी संपर्क साधावा किंवा ७०२०८२१७८५, ९८५०५२८८८५ या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Back to top button