भंडारा : मद्यधुंद पोलिसाचा बारमध्येच धिंगाणा | पुढारी

भंडारा : मद्यधुंद पोलिसाचा बारमध्येच धिंगाणा

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : वरठी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मद्यधुंद अवस्थेतील पोलिस हवालदाराने बिअर बार मध्ये धिंगाणा घातला. कारमधील तलवार काढून बार मालकाला धमकी दिली. ही घटना भंडारा शहरातील शास्त्री चौकातील एका समोर घडली. सुनील भोंगाडे (वय ४१) रा. शुक्रवार वॉर्ड, भंडारा असे त्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.

अधिक माहीती अशी की, पोलिस हवालदार भोंगाडे मंगळवारी शास्त्री चौकातील एका बारमध्ये गेले होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी बार मालकाशी व तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. बारमालकाने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. पण भोंगाडे यांनी त्यांच्या कारमधून दोन तलवारी काढल्या व त्यांना मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बारमालक सत्यपाल तुरकर यांनी भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button