स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष : मुख्यमंत्र्यांना भाजप पाठवणार ७५ हजार पत्रे - पुढारी

स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष : मुख्यमंत्र्यांना भाजप पाठवणार ७५ हजार पत्रे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप ७५ हजार पत्रे पाठविणार आहे. अमरावती शहरातून या अभियानाची प्राथमिक सुरुवात झाली आहे.

देश कितवा स्वातंत्र्य दिवस ( स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष) साजरा करतोय याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नसल्याचा आरोप भाजपने याआधी केला होता. त्यानंतर आता याचे मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देण्यासाठी भाजपकडून ७५ हजार पत्रे लिहून पाठविण्यात येणार आहेत. या अभियानाची सुरूवात सध्या अमरावती शहरातून होत आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाने उद्धव ठाकरे यांना ही ७५ हजार पत्रे लिहिणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वादानंतर भाजप आता गांधीगिरीची पर्याय स्विकारत आहे.

राज्यभरातून युवा मोर्चा कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना ७५ हजार स्मरण पत्रे पाठविणार आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनीही ट्विट करुन भाजपच्या गांधीगिरी अभियानाविषयी माहिती दिली आहे.

हेही वाचलंत का?

पाहा : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button