गडचिरोली: केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी | पुढारी

गडचिरोली: केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

गडचिरोली: पुढारी वृत्तसेवा : जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सिरोंचा तालुक्यात पूर आला होता. या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आज (दि.२) केंद्रीय पथक सिरोंचा येथे आले होते. या पथकातील अधिकाऱ्यांनी सिरोचा, आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली.

यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवून आवश्यक ती प्रकिया तातडीने करण्याची ग्वाही आपद्ग्रस्तांना दिली.

त्यानंतर केंद्रीय पथकाने गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांकडून पूरबाधित नुकसानीची माहिती जाणून घेतली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button