अमरावती : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात १ ठार, १९ जण जखमी | पुढारी

अमरावती : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात १ ठार, १९ जण जखमी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अंजनगाव ते अकोट या महामार्गावर आज (दि. १) तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार झाला. या अपघातात एकूण १९ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ज्यात ५ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. विशाल रामदास पवार (वय ३५, रा. माळीपुरा अंजनगांव सूर्जी) या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातामध्ये शेख आसीफ शेख आदिल (२०, रा अंजनगांव), आसम शहा मिराकीसन शहा (६०, रा. अकोला), सुखाबाई रामचंद्र राऊत (५०, रा. अंजनगांव), गुलाब मेश्राम (५०, रा. करोडा, मध्य प्रदेश), सुफीयन शहा (८, रा. अकोला), आशीया बी शफाकत शहा (४०, रा. दर्यापूर), अरमान शरफकन (१५, रा. अकोला), अनुसया शंकर भावे (६५, रा. अंजनगाव), मो. अफजद मो मुस्ताक (५०, रा. अकोट), रहीमा बी कासम शहा (५०, रा. अकोला), मुदरसींग शहा समयत शहा (१५, रा अकोला), आसमा परविन मजवर शहा (२९, रा. अकोला), आजमा परविन मझवर शहा (८, रा. अकोला), फतीमा बी मो अफजद (४०, रा. अकोट), अलीया बी शफाकन शहा (१३, रा. अकोला), सुशीला वासुदेव शिनकर (६५, रा. अंजनगाव), मायरा फीरदोस (६, रा. अकोला), श्रीहरी राऊत (३१, रा. हीवरखेड), ओम निलेश निमकाळे (१५, रा. भंडारज अजनगाव) अशी या अपघातातील जखमीची नावे आहेत. जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालय, ऊपजिल्हा रुग्णालय परतवाडा, अकोला येथे पाठवण्यात आले.

आज बाजाराचा दिवस असल्यामुळे अंजनगांव ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जखमींवर उपचार केले. जखमींना भंडारज येथून मिळेल त्या वाहनाने ग्रामिण रुग्णालयात पोहचवण्यात आले. मात्र बाजाराचा दिवस असल्याने गर्दीमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्यात नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागाला.

Back to top button