यवतमाळ : 'राज्य उत्पादन शुल्क'चा दुय्यम निरीक्षक जाळ्यात

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा: मारेगाव तालुक्यातील एका दारू विक्रेत्याकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पांढरकवडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक दुय्यम निरीक्षक शंकर गोविंदा घाटे असे अटक करण्‍यात आलेल्‍याचे नाव आहे.

१२ हजार रुपयांच्‍या लाचेची मागणी

शंकर घाटे याने तक्रारकर्त्याकडे विदेशी मद्य परवान्यावर कारवाई न करण्यासाठी सहा हजार रुपये तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षकासाठी मासिक हप्ता म्हणून सहा हजार रुपये, अशा एकूण १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

घाटे याला १२ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

ही कारवाई अमरावती येथील एसीबीचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या निर्देशाने करण्यात आली.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ : अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक |

https://www.youtube.com/watch?v=N6h2QLAETro

Exit mobile version