भंडारा : बीएसएफच्या जवानाचा तलावात बुडून मृत्यू | पुढारी

भंडारा : बीएसएफच्या जवानाचा तलावात बुडून मृत्यू

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : साकोली तालुक्यातील आलेबेदर येथील वन तलावात बुडून ‘बीएसएफ’च्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठकसेन आसाराम मडावी (३५, रा. पिंडकेपार ता. साकोली ) असे मृत पावलेल्या जवानाचे नाव आहे.

ठकसेन मडावी हे बीएसएफ जवान हाेते. आसाम येथे ते कार्यरत हाेते. ते सध्या ४ महिन्यांसाठी गावी रजेवर आले होते. आलेबेदर येथील वनतलावात बुडून ठकसेन यांचा मृत्यू झाला. या तलावाला मारबत तलाव असेही म्हणतात. ठकसेन मडावी यांच्या मागे वडील, पत्नी, व दोन मुली आहेत.

हेही वाचा

Back to top button