अमरावती : सेनेकडून भाजप कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न | पुढारी

अमरावती : सेनेकडून भाजप कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अमरावती येथे सेनेच्‍या कार्यकर्त्यांनी  भाजप कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला.अमरावती येथील भाजप कार्यालयावर शिवसेनेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोदात नारायण राणे विधान केले होते. राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध शिवसेनेकडून करण्यात आला. भाजपच्या अमरावती जिल्हा कार्यालयावर सैनिकांनी हल्ला केला.

यावेळी डिझेल टाकून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना अमरावती महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी यावेळी आंदोलन केले.

आंदोलन दरम्यान भाजपचे कोणतेही पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कार्यालय ठिकाणी उपस्थित नव्हते. आंदोलन झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button