Yavatmal Crime : जागेचा वाद; लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून | पुढारी

Yavatmal Crime : जागेचा वाद; लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित वाट्याला आलेली जागा कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला का विकली, यावरून वाद घालत लहान भावाने मोठ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मोठ्या भावाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू (Yavatmal Crime) झाला.

ही घटना दिग्रस तालुक्यातील विठाळा येथे घडली. याप्रकरणी बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. (Yavatmal Crime)

ज्ञानेश्वर उत्तम बोरकुटे (वय ४५, रा. विठाळा) असे मृताचे नाव आहे. त्याने वडिलांच्या नावाने असलेली जागा गावातील खुशाल चव्हाण याला विकली.

कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीला जागा का विकली यावरून वाद झाला. या वादात आरोपी लहान भाऊ गोविंद उत्तम बोरकुटे ( वय ३८) व जागा विकत घेणारा या दोघांनी संगनमत करून ज्ञानेश्वरला बेदम मारहाण केली. यात ज्ञानेश्वर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ज्ञानेश्वरचा रुग्णालयात मृत्यू झाला.

ज्ञानेश्वरची बहिण जिजाबाई उर्फ सकुबाई जगन्नाथ भिसनकर (रा. दिग्रस) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सोनाजी आमले करत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

 

 

Back to top button