अबब...ठाण्यातूनच पोलिसांची गाडी घेऊन आरोपी पसार | पुढारी

अबब...ठाण्यातूनच पोलिसांची गाडी घेऊन आरोपी पसार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : पोलीस म्हटले तर चांगल्या चांगल्यांची पाचावर धारण बसते. त्यामुळे पोलिसांपासून दूरच राहणे लोक पसंत करतात. मात्र एक जण पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अटक करून ठाण्यात आणलेल्या एका आरोपीने तर चक्क पोलिसांची गाडी घेऊन ठाण्यातून पसार झाल्याची घटना आज (दि. १०) रविवारी वरोरा पोलिस ठाण्यात घडली. राकेश असे आरोपीचे नाव आहे. पोलिस परत आरोपी आणि गाडीचा शोध घेत आहेत.

वरोरा शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील मजरा गावात राकेश नावाचा व्यक्ती दारूचा नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने मजरा गावात जावून गोंधळ घालणाऱ्या राकेश नावाच्या आरोपीला पोलिस ठाण्यामध्ये आणले. त्याच्यावर 185 कलमान्वये कारवाई देखील करण्यात आली. मात्र, हा आरोपी लघुशंकेसाठी बाहेर जातो, असे सांगून पोलिस ठाण्याच्या बाहेर पडला. पोलिस ठाण्यातच्या आवारातच उभी असलेली 185 क्रमांकाची पोलिसांच्या वाहनाची चावी लागलेली गाडी घेऊन त्याने ठाण्यातूनच पळ काढला.

पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरोपीचा पाठलाग करणे सुरू केले. तोपर्यंत आरोपी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील येसा या गावापर्यंत पोहोचला होता. पुढे आरोपी आणि मागे पोलिस असा फिल्मी स्टाईल प्रकार सुरू होता. त्यांनतर पोलिस आपल्याला पाठलाग पकडणार असल्याचे लक्षात येताच त्याने गाडी अधिक जलदगतीने चालविण्याचा प्रयत्न करताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर आदळली. त्‍यानंतर आरोपीला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा

Back to top button