नागपूर : महिला व पुरुषाची हत्या करुन फेकले वेण्णा नदीत | पुढारी

नागपूर : महिला व पुरुषाची हत्या करुन फेकले वेण्णा नदीत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर जिल्ह्यातील ग्रामिण भागात दुहेरी हत्याकांडाची गंभीर घटना उघडकीस आली आहे. एक महिला व पुरूषाची हत्या करून त्यांचे मृतदेह वेण्णा नदीत फेकून देण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या दोघांचेही हातपाय नायलॉन दोरीने बांधून ठेवले होते. अद्याप दोन्ही मृत्तदेहाची ओळख पटलेली नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिस आरोपीची शोध घेत आहेत.

बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई खैरी शिवारातील वेणा नदीत ही घटना घडली आहे. नदीच्या पुलावरून जात असताना एका व्यक्तीला नदीपात्रात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. त्याने याबबातची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.७) रोजी वेण्णा नदीवरील पुलावरून जात असताना एका व्यक्तीला नदीपात्रात दोन मृतदेह तरंगताना दिसून आले. यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. मदतनीसाच्या साहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेह अंदाजे २५ ते ३० वयोगटातील असून त्यांना एकाच नायलॉन दोरीने बांधले आहेत.

२० ते २५ किलो वजनाच्या दगडाला बांधून नदीत फेकून दिले असावे. आणि या घटनेला किमान ८ ते १० तास झाले असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आसा असून पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणं सुरू केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button