भंडारा-तुमसर मार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; चालकाचा होरपळून मृत्यू | पुढारी

भंडारा-तुमसर मार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; चालकाचा होरपळून मृत्यू

नागपूर पुढारी वृत्तसेवा : भंडारा-तुमसर राज्य मार्गावर ट्रक आणि टिप्परमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत टिप्पर चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली. या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात ट्रक आणि टिप्परमध्ये भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत एका गाडीतील ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुसऱ्या ट्रकचा ड्रायव्हर वेळीच बाहेर निघाल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. दाबा गावाजवळ एनएल-०, एई ८०८१ क्रमाकांचा कोळसा भरलेला ट्रक जात असताना ट्रकला समोरून भरधाव येणाऱ्या एमएच-४०, बीएल-११५७ क्रमाकांच्या टिप्परने समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर ठिणगी उडून कोळसा भरलेल्या ट्रकला आग लागली.

प्रसंगावधान राखत वेळीच कोळसा भरलेल्या ट्रकचा चालक बाहेर निघाला. मात्र टिप्परचे केबीन चेपल्याने टिप्परचा ड्रायव्हर अडकून होता. दरम्यान कोळसा भरलेल्या ट्रकला लागलेली आग पसरून टिप्परलाही लागल्याने अडकलेल्या ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाला आहे. याची माहिती वरठी पोलिसांना व अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाला घटनास्थळ गाठत आग विझवण्यात यश आले. पोलिसांनी लगेच पंचनामा सुरू केला. दरम्यान या अपघातानंतर भंडारा-तुमसर मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button