नागपूर : पाटणसावंगी येथे दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

नागपूर : पाटणसावंगी येथे दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर जिल्ह्यातील पाटणसाावंगी येथे दोन लहान मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. साक्षी मीना (वय ६) व राधिका मीना (वय २) या दोन लहान मुलींची नावे आहेत. या अनाचक घडलेल्या घटनेने पाटणसावंगी गावातील नागरिंकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अद्याप मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी दोघींचे मृतदेह पाठविण्यात आले आहेत.

याबातची माहिती अशी की, पाटणसावंगी येथील कॉटनमार्केट परिसरात एका झोपडीवजा घरात गंगाबाई काळे राहतात. त्यांची मुलगी माधुरीचे ओळखीतून राजस्थानातील मीना कुटुंबात लग्न झाले होते. माधुरीला साक्षी मीना (वय ६) व राधिका मीना (वय २) या दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी गंगाबाई काळे यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, मुलगी माधुरी ही राजस्थानात असल्याने अंत्यसंस्काराला आली नाही. म्हणून काही दिवसांनी गंगाबाई काळे राजस्थानला जाऊन दोन मुलींना आपल्या गावी घेवून आल्या होत्या. गेले दोन ते अडीच महिन्यांपासून त्या पाटणसावंगीला येथे राहात होत्या.

याच दरम्यान सोमवार (दि. ४ जुलै) रोजी रात्री उशिराने दोन्हींना गंगाबाई हिने शौचास घेवून गेल्या होत्या. आल्यानंतर साक्षी व राधिका दोघींही गळ्यात खवखव होत असल्याने प्राथमिक उपचार गंगाबाईनी केले. परंतु, मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोघींचाही मृत्यू झाला.
यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी दाखल होत दोघीचे मृत्तदेह शवविच्छेदनासाठी मेयोला पाठविले. मुलींना अन्नातून विषबाधा झाली की?, साप चावल्याने मृत्यू झाला? याविषयी नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button