भंडारा : वीज कोसळून दोन दिवसात दोघांचा मृत्यू | पुढारी

भंडारा : वीज कोसळून दोन दिवसात दोघांचा मृत्यू

भंडारा पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमध्‍ये ७ शेळ्यांचाही मृत्यू झाला आहे.

शनिवारी दिवसभर पावसाचा अंदाज होता. दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मोहाडी तालुक्यातील काटेबाम्हणी येथे आज दुपारी तीनच्या सुमारास वीज कोसळून दुर्गा चवतमल राऊत (४२) रा. काटेबाम्हणी  यांचा मृत्‍यू झाला.

शुक्रवारी मोहाडी तालुक्यातील बेटेखारी शेतशिवारात वीज कोसळून दिनेश प्रभू सोनेकर ( रा. जांब ) या शेतमजुराचा मृत्यू झाला. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा येथे अशोक दामाजी पिंपळशेंडे आणि टेकराम चोपकर हे  वीज पडून जखमी झाले. याशिवाय पवनी तालुक्यातील सेलारी येथे वीज कोसळल्याने ताराचंद मुंडले त्‍यांच्‍या तीन तर   संजय रमेश शेंद्रे, सचिन रमेश शेंद्रे यांच्या प्रत्‍येकी दाेन  शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.

हेही वाचा

Back to top button