यवतमाळ : सुनेच्या छळाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या | पुढारी

यवतमाळ : सुनेच्या छळाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : सुनेच्या छळाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या : सुनेकडून वारंवार होणारा अपमान सहन न झाल्याने सासर्‍याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. अवधूतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत लोहारा येथे ही घटना गुरुवारी उघडकीस आली.

साहेबराव दवणे (वय ६५) रा. पंचशीलनगर लोहारा असे मृतकाचे नाव आहे. ते येथील एमआयडीसीमध्ये चौकीदार म्हणून काम करीत होते. त्यांनी चार बचत गटाचे कर्ज उचलून मुलगा सूरज याचा विवाह करुन दिला होता.

सुनेच्या छळाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या

नवीन सून घरात आली. तिने सासू-सासर्‍यांची सेवा करण्याऐवजी क्षुल्लक कारणावरुन वाद घालने सुरू केले. लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू नये असा दबाव तिने पतीवर आणला होता.

सासर्‍याला अश्लील शिवीगाळ करून तुम्हाला जेलमध्ये टाकतो अशी धमकीही तिने दिली होती. मानसिक धक्का बसल्याने साहेबराव दवणे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून गळफास लावून घेतला.

सासर्‍याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संध्या सुरज दवणे (वय २२) असे सुनेचे नाव आहे. पुढील तपास अवधूतवाडी पोलिस करीत आहे.

 हे ही वाचलं का?

 

Back to top button