भंडारा : होडी उलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

भंडारा : होडी उलटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे चुलबंद नदीतून शेताकडे जात असताना होडी उलटल्याने एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. निळकंठ जनार्धन बगमारे (वय ३६, रा. विलम, ता. पवनी, जि. भंडारा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

नीलकंठ बगमारे यांची ईटान येथे शेती आहे. शेताकडे जाताना चुलबंद नदी पार करावी लागते. नीलकंठ हे दररोज डोंग्यातून शेताकडे ये-जा करत. नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना नदी पात्राच्या मध्यावर गेले असता डोंगा चालविण्याचा वेरू तुटल्याने डोंगा उलटला. यामध्ये नीलकंठ यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पवनी पोलिसांत झाली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button