बिबट वाघासोबत झालेल्या झुंजीत ठार | पुढारी

बिबट वाघासोबत झालेल्या झुंजीत ठार

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भद्रावती तालुक्यातील टाकळी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार होण्याच्या घटना ताजी असतानाच वाघासोबत झालेल्या झुंजीत बिबट ठार झाल्याची घटना आज गुरूवारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या वसाहतीत आज दि.१९ ऑगस्ट रोजी बिबट मृतावस्थेत आढळून आले. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

सदर बिबट्या नर प्रकारचा असून ७ ते ८ वर्षे वयाचा आहे. पट्टेदार वाघासोबत झालेल्या झुंजीत तो ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास भद्रावतीचे वन परिक्षेत्र अधिकारी शेंडे करीत आहे.

Back to top button