Chandraur : आठ वर्षीय चिमुकलीवर ३६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार | पुढारी

Chandraur : आठ वर्षीय चिमुकलीवर ३६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर तिलुक्यातील शंकरपूर येथील एका ३६ वर्षीय नराधमाने ८ वर्षाच्या चिमुकलीवर शुक्रवारी (दि २४ जून) सायंकाळच्या सुमारास अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी राजीक उर्फ काल्या (वय ३६) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Chandraur)

याबाबत अधिक माहिती अशी की, चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे पीडित मुलीच्या आजोबाचे देशी दारूच्या भट्टीवर नाष्ट्याचे  दुकान आहे. या दुकानात लागणारा माल हा घरून बनवून विकला जातो. त्यामुळे शुक्रवारी पीडित मुलगी आईने उकडून दिलेले अंडे घेऊन आजोबाच्या देशीभट्टीला लागून असलेल्या दुकानवर गेली होती. तिथे राजीक उर्फ काल्या (वय 36) हा नराधम दारू पीत होता. दुकानमध्ये अंडे दिल्यानंतर पीडित मुलगी घरी जाताना एकटी होती. दरम्यान, एकटी जाताना पाहून तो तिच्या मागे दुचाकीने गेला. तिला घरी सोडून देण्याचा बहाना करून गाडीवर घेऊन गेला. रस्त्यात असलेल्या राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जनस्थळी तिच्यावर अमानुष अत्याचार केला. (Chandraur)

पीडित मुलीने आपल्या आईला हा सगळा प्रकार सांगितला. मुलीची आई तिला सोबत घेऊन पोलीस चौकी गाठण्यासाठी निघाली. दरम्यान वाटेतच आरोपी नराधम दिसला असता पीडित मुलीच्या आईने त्याची कॉलर धरून पोलीस चौकीकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण,  तो हिसका मारून पळून गेला. त्यानंतर पीडितेच्या आईने लगेच पोलीस चौकी गाठून घटनेची हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को व ॲट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Chandraur)

हेही वाचलतं का?

Back to top button