अकोल्यात हवाल्याची ४३ लाखांची रोकड जप्त | पुढारी

अकोल्यात हवाल्याची ४३ लाखांची रोकड जप्त

अकोला; पुढारी वृत्तसेवा: येथील रेल्वे स्थानकावर सुमारे ४३ लाखांची हवाल्याची रोकड रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केली.  एकाला  ताब्यात घेण्‍यात आले आहे. ४३ लाखांची रोकडसह अकोला जीआरपीकडे संशयित आरोपी मनोज हरीराम शर्मा (वय २२, शास्त्रीनगर अकोला) याला  सपूर्द केली आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस ट्रेन (क्रमांक ०२१०६, B4)मध्ये अज्ञात प्रवाशाला ४३ लाख रोख रक्कम देण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा रचला.

४३ लाख रक्कम नेणाऱ्या आंगडीया कुरियरच्या कर्मचाऱ्याला पकडण्यासाठी हा सापळा रचला होता. या दरम्यान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्याकडून काळ्या रंगाची जाड पिशवीतून रक्कम घेऊन जाताना त्‍याला रंगेहाथ पकडण्‍यात आले.

यानंतर आरपीएफ पोलीस स्टेशन अकोला येथे कर्मचाऱ्याला आणण्यात आले. या संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याने मनोज हरीराम शर्मा असे नाव सांगितले. त्‍याच्‍याकडे आढळलेल्‍या बॅगवरुन पुढील तपास सुरु असल्‍याचे पाेलिसांनी  सांगितले.

हेही वाचलंत का? 

पाहा व्‍हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button