चंद्रपूर : पतीची आत्महत्या तर पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी

चंद्रपूर : पतीची आत्महत्या तर पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पहाटेच्या सुमारास कडू लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने पतीने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही वेळातच पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र समय सूचकतेने पत्नीचे जीवन वाचले. ही घटना आज मंगळवारी घुग्घूस येथील अमराई वार्डात सकाळच्या सुमारास घडली. सुरज सुरत गंगाधर माने असे मृत पतीचे नाव असून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचे नाव रत्नमाला उर्फ सोनी माने असे आहे.

मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घुग्घुस येथील अमराई वार्ड क्र.1 येथे राहणारे सुरज गंगाधर माने (28) यांनी घराच्या अंगनातील कडुनिंबाच्या झाडाच्या फांदीला नायलनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. तर काही वेळातच त्याची पत्नी रत्नमाला उर्फ सोनी माने (25) पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

परंतु समयसुचकतेने तिचे जीव वाचविण्यात यश आले. सदर घटनेची माहिती मिळताच काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहीका बोलावून गंभीर अवस्थेत असलेल्या पत्नी रत्नमाला माने हिला घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. पण प्रकृती अत्यवस्थ झाल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

सहा. पो. नि. संजय सिंग, पोहवा. मंगेश निरंजने, महेश मांढरे, स्वप्नील बोंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला.

सुरज व रत्नमाला यांचा प्रेमाविवाह असून त्यांना आयुष 4 वर्षाचा व आर्यन 2 वर्षाचा अशी दोन लहान मुल आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहे.

हे ही वाचलत का :

संशोधनाची सुरुवात शाळेतूनच व्हायला हवी : इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर

Back to top button