अमरावती : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

अमरावती : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा; शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिला बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. ही धक्कादायक घटना (रविवार) बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी आरोपी शुभम मुरलीधर बोंडे (वय 27, रा. दस्तुर नगर) याच्या विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

तरुणी 2016 मध्ये शहरातील एका महाविद्यालयात बीएससी कंम्प्युटर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. त्यानंतर ती 2018 मध्ये कंपनीच्या मुलाखतीसाठी शहरातील अन्य एका महाविद्यालयात गेली. त्यावेळी तिची ओळख शुभम बोंडेसोबत झाली. दरम्यान तुला शिक्षणासाठी काही मदत लागली तर सांग, असे शुभमने तरुणीला सांगितले होते.

दरम्यान, 6 जानेवारी 2019 रोजी शुभमने तरुणीला लॅपटॉपची आवश्यकता असल्याचे सांगून तिला अकोली मार्गावरील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर बोलाविले. त्या ठिकाणी शुभमने तरुणीला शीतपेय प्यायला दिले. त्यानंतर मुलीला गुंगी आली. यानंतर बेशुध्द अवस्‍थेतील तरूणीवर शुभमने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.

सदर प्रकार कुणाला सांगू नको, नाही तर तुझी बदनामी करेन, अशी धमकी शुभमने तरुणीली दिली. त्यानंतर 19 मार्च 2022 रोजी शुभमने बदनामीची धमकी देत पुन्हा तरुणीला शारिरिक संबंध करण्यासाठी बोलाविले. तरुणीला वारंवार मोबाइलवर कॉल करून शारीरिक संबंधासाठी बोलाविण्यात येत होते. अन्यथा बदनामी करण्याची धमकी देण्यात येत होती. त्यामुळे शुभमच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर बडनेरा ठाणे गाठून शुभम बोंडेविरुद्ध तक्रार दिली.

हे ही वाचलंत का ?  

Back to top button