नागपुरात दोन गटात झालेल्या राडा प्रकरणात चौघांना अटक

नागपुरात दोन गटात झालेल्या राडा प्रकरणात चौघांना अटक
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात भालदारपुरा परिसरात दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटने प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. गुरुवारी (दि.१०) मध्यरात्री रात्री दोन गटातील हाणामारीची ही घटना समोर आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत, त्यांना अटक केली आहे. या घटनेचे पडसाद उमटू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मोहम्मद इमरोज मोहम्मद युनूस उर्फ राजा (वय ३५, रा. भालदारपुरा), मोहम्मद इमरान मोहम्मद इकबाल ऊर्फ इम्मा (वय ३६ रा. हिंगणा), सुफियाना राजा मुश्‍ताक अहमद (रा. भालदारपुरा), शेख मोहम्मद शाहनवाज शेख (भालदारपुरा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपनीमध्ये काम करीत असलेला राजू बलगिये (रा. पारडी) हा काम संपवून घराकडे जात होता. मात्र, वाटेत गवळीपुरा येथे असलेल्या त्याच्या काकाच्या घराकडे आला. यावेळी परिसरात त्याच्या मित्रांना काही युवक मारहाण करीत असल्याचे दिसल्याने त्याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी राजूलाही मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. दरम्यान याबाबत त्याने गणेशपेठ पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

शुल्लक वाद गेला विकोपाला

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री गवळीपुरा येथील काही युवकांसोबत भालदारपुरा येथील युवकांचे भांडण झाले. त्यातून दोन्ही गटांमध्ये वाद विकोपाला गेल्याने त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यातून हा वाद पोलिसांकडे पोहचला. त्यातून दोन्ही गटातील व्यक्तींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

पोलिस आयुक्त, उपायुक्तांची भेट

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी या वादाला कुठलाही राजकीय रंग मिळू नये याची खबरदारी घेत, घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्यासह ताफाही घटनास्थळावर होता. खबरदारी म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news