नागपूर : गँगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक | पुढारी

नागपूर : गँगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पन्नासपेक्षा अधिक गुन्ह्यांत आरोपी असलेला आबू खानला नागपूर पोलिसांनी भंडारा शहरातून अटक केली आहे. या कारवाईने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

नागपूर येथील आबू खान याच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे असल्याची माहिती आहे. त्याच्यावर मोक्का लागल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. मात्र, विविध शहरात नाव बदलून राहणारा आबू पोलिसांना नेहमी गुंगारा देत होता.

विदर्भातील अमरावती, गडचिरोली या शहरासह गुजरातमधील अहमदाबाद येथेही तो काही दिवस राहिला होता. त्याच्या ठिकाणाबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अनेकदा तो राहत असलेल्या ठिकाणी छापे घातले. मात्र, प्रत्येकवेळी तो पोलिसांना चकमा देऊन पाळण्यात यशस्वी झाला. मागील काही दिवसांपासून आबू खान हा भंडारा शहरात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. काही दिवस त्याच्यावर गुप्त पाळत ठेवून नागपूर पोलिसांनी त्याला रविवारी पहाटे भंडारा शहरातून अटक केली.

हेही वाचा 

Back to top button