नागपूर : चिंच तोडण्याच्या बहाण्याने  सात मुलांवर अनैसर्गिक कृत्य  | पुढारी

 नागपूर : चिंच तोडण्याच्या बहाण्याने  सात मुलांवर अनैसर्गिक कृत्य 

नागपूर पुढारी वृत्तसेवा : आंबा, चिंच तोडण्याच्या बहाण्याने लहान मुलांशी मैत्री करून ७ मुलांवर अनैसर्गिक कृत्य केल्याचा किळसवाणा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. मयूर मोडक ( वय २८)  असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्‍याला नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे.

 सात मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडला आला आहे. मयूर मोडक ( वय २८)  असं आरोपी तरुणाचं नाव आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मयूरवर एका महिन्यात सात मुलांसोबत अनैसर्गिक  कृत्य केल्याचा आरोप आहे.

माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेलेल्‍या मुलांना  घेवून मयूर माेडक महाराजबाग परिसरात आंबे तोडण्याच्या बहाण्याने घेऊन जायचा. तिथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.  कोणाला याबद्दल सांगू नये  म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा. साेमवारी ( ३० मे ) एका ९ वर्षाच्या चिमुरड्याने कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. आरोपी मयुर सध्या फरार असून, पोलीस त्‍याचा शाेध घेत आहेत.

हेही वाचलंत का?

 

Back to top button