बीड : भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाच्या धडकेत शिक्षक ठार | पुढारी

बीड : भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाच्या धडकेत शिक्षक ठार

धारूर ; पुढारी वृत्तसेवा : धारूर (बीड)  केज रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान एका भरधाव वाहनाने एका पादचारी शिक्षकास उडवले. गणेश नागनाथ मिठेवाड (वय 40 वर्ष) असे त्यांचे नाव आहे. या अपघातात ते जागीच ठार झाले. मात्र धडक दिलेला वाहनचालक पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी सायंकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.

धारूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान रविवारी 22 मे रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान घडली. रस्त्याने पायी चालणारे पादचारी शिक्षक गणेश नागनाथ मिठेवाड यांना एका भरधाव येणाऱ्या वाहनाने उडवले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते जागीच ठार झाले असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मिठेवाड हे जिल्हा परिषदेला शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button