यवतमाळ : अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याप्रकरणी आई-वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल | पुढारी

यवतमाळ : अल्पवयीन मुलीचं लग्न लावल्याप्रकरणी आई-वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी मुलीच्या आईसह मुलगा व त्याच्या वडिलांविरूद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला सुरेश गायकवाड (रा. लाखखिंड), अनिकेत प्रवीण भालेराव व प्रवीण भालेराव (रा. धानोरा पोकाटी ता. नांदगाव खंडेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत.

ग्रामसेवक सागर वानखडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, लाख येथील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या आई वडिलांनी धानोरा कोकाटे येथील युवकासोबत लग्न ठरविण्यात आले होते. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा बालसंरक्षक अधिकारी माधुरी पावडे व सुनील बोक्से यांनी गावात भेट देऊन मुलीच्या आईला बालविवाहाच्या विपरीत परिणामाबाबत समजावून सांगितले. तसेच मुलीला बालकल्याण समिती समक्ष हजर करून तिचा जबाबदेखील घेण्यात आला होता. परंतु त्यानंतर १३ मे रोजी मुलीचा विवाह लावण्यात आला. याबाबत माहिती मिळताच बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. डॉ. प्राची निलावार यांनी कारवाई केली. डॉ निलावार यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक सागर वानखडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का

Back to top button