हमालाचा मुलगा बनला मर्चंटनेव्हीमध्ये अधिकारी | पुढारी

हमालाचा मुलगा बनला मर्चंटनेव्हीमध्ये अधिकारी

वाशिम; अजय ढवळे : अलीकडे चांगलं शिक्षण आणि नोकरीसाठी घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असायला हवी असी ओरड असते. मात्र दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील कांरजा मधील एका हमालाच्या मुलाने मर्चंन्टनेव्ही मध्ये इलेक्ट्रो टेक्नीकल आँफीसर सारख्या महत्वाच्या पदाला गवसनी घालून जिद्द, चिकाटी मेहनतीला पर्याय नाही हेच दाखवून दिले आहे.

कांरजा येथील शिवाजी नगरातील नितेश चंद्रकांत जाधव याने नुकतीच मर्चंन्टनेव्ही मधील इलेक्ट्रो टेक्नीकल ऑफीसर पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तो येत्या जुन महिण्यात त्या पदावर रूजू होणार आहे.  नितेशचे वडील चंद्रकांत जाधव हे कांरजा बाजार समितीत हमालीचे काम करतात तर आई गृहिणी आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण मुलांनी शिकून नोकरी करावी यासाठी त्यांची धडपड असते.

नितेशने कांरजा येथील नगर पालिकेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर  बी. ई. इलेक्ट्रिकल ही पदवी संपादन केली. पुढे इतरांप्रमाणे शासकीय सेवेत नेाकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटामुळे शासकीय सेवेत नेाकरी मिळणे कठीण असल्याचं त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने सप्टेंबर 2021 मध्ये ही परीक्षा दिली आणि त्यात 81 टक्के गुण संपादन केले. नितेशचा मोठा भाऊ पुणे येथील हनिवेल ऑटोमेशन कंपनीत चांगल्या पदावर आहे आणि लहान भाऊ बीएएमएसच्या तृतीय वर्षात शिकत आहे.

नितेशला नेव्ही मर्चंन्टमधील या नेाकरीसाठी त्याला दोन लाख रूपये प्रतिमहिना वेतन मिळणार असून जहाजावरील इलेक्ट्रिकची कामे त्याला करावी लागतील. यासाठी त्याला कोणचेही मार्गदर्शन लाभले नसुन त्याने इंटरनेटलाच मार्गदर्शक समजून शिक्षण ते नेाकरी असा प्रवास पुर्ण केला आहे.

कांरजातील नितेश जाधवची जिद्द, चिकाटी व मेहनत प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकृत करुन शिक्षणाची वाट धरल्यास नोकरी मिळत नाही असे म्हणण्याची वेळ येणार नाही, हे नितेशने सिद्ध करुन दाखविले.

Back to top button