गडचिरोली : नक्षल्यावाद्यांकडून आत्मसमर्पित नक्षल युवकाची हत्या - पुढारी

गडचिरोली : नक्षल्यावाद्यांकडून आत्मसमर्पित नक्षल युवकाची हत्या

गडचिरोली : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी शुक्रवारी (दि.१३) रात्री एटापल्ली तालुक्यातील मेंढरी (रामनटोला) येथील एका युवकाची हत्या केली. अमोल तिम्मा असे मृत युवकाचे नाव आहे.

काही वर्षे नक्षल चळवळीत घालवल्यानंतर अमोलने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर तो गावाकडे राहायला गेला होता. मात्र नक्षल्यांनी शुक्रवारी रात्री त्याची गावाबाहेर गळा चिरून हत्या केली. पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली, असा कयास आहे.

Back to top button