गडचिरोली : तेंदूपाने तोडताना ५ अस्वलांच्या हल्ल्यात ४ महिला गंभीर जखमी | पुढारी

गडचिरोली : तेंदूपाने तोडताना ५ अस्वलांच्या हल्ल्यात ४ महिला गंभीर जखमी

गडचिरोली, पुढारी वृत्‍तसेवा : तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर अस्वलांनी हल्ला केला. यामध्ये ४ महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवार (दि. 7) सकाळी कुरखेडा तालुक्यातील कोहका क्षेत्रातील जंगलात घडली. सीमा रतिराम टेकाम (वय २१), लता जीवन मडावी (वय ३५), पल्लवी रमेश टेकाम (वय २५) व रमशीला आनंदराव टेकाम (वय ३८) अशी जखमी महिलांची नावे असून, त्या सर्व दादापूर येथील रहिवासी आहेत.

सध्या तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरु असल्याने दादापूर येथील १४ महिला आणि पुरुष कोहका क्षेत्रातील जंगलात पहाटे गेले होते. तेंदूपाने तोडत असताना सकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक ५ अस्वलांनी महिलांवर हल्ला चढविला. यात चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड करताच शेजारी तेंदूपाने तोडणारे नागरिक धावून आल्याने अस्वलांनी पळ काढला. त्यानंतर रुग्णवाहिकेने जखमींना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. वनाधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्याचे  आश्वासन दिले.

हेही वाचा  

‘बीआरओ’प्रकल्पांमुळे दुर्गम भागात सामाजिक,आर्थिक विकास करणार : राजनाथ सिंह 

Musk Twitter Deal : ट्वीटरची खरेदी पडणार लांबणीवर? एलन मस्क विरोधात याचिका दाखल

राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना मतदारांच्या भावनेचा विचार करा : भाजप नेते आनंद रेखी

Back to top button