नागपूर : डीजेवर नाचताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने तरुणाला भोसकले | पुढारी

नागपूर : डीजेवर नाचताना झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने तरुणाला भोसकले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभात डीजेच्या तालावर थिरकताना उद्भवलेल्या वादातून रागाच्या भरात अल्पवयीन आरोपीने चाकूने भोसकून खून केल्याची घटना काटोल येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी काटोल पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. राहुल श्रावण गायकवाड (वय २७, रा. अण्णाभाऊ साठे नगर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत राहुल व अल्पवयीन आरोपी एकाच परिसरात राहत असल्याने दोघेही एकमेकांना ओळखत होते. याआधी छोट्यामोठ्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. एका लग्न समारंभात रात्री डीजेवर आरोपी व राहुल आणि काही जण डान्स करत होते. यावेळी त्या दोघामध्ये वाद झाला. त्यानंतर १३ वर्षीय आरोपीने स्वतःजवळ असलेल्या चाकूने राहुलवर वार केले. यात राहुल गंभीर जखमी होऊन जागेवर कोसळला. या घटनेमुळे लग्न समारंभात एकच खळबळ उडाली.

जखमीला नागपूर येथे उपचारकरिता नेण्यात आले असता आज (दि.३०) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत चौकशी करून त्याला बाल सुधारगृहात रवाना करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे, ठाणेदार महादेव आचरेकर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button