चंद्रपुरात कॅफे मद्रास हॉटेलला भीषण आग | पुढारी

चंद्रपुरात कॅफे मद्रास हॉटेलला भीषण आग

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रास या हॉटेलला आज (सोमवार) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले असून, आग आटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील कॅफे मद्रास या हॉटेलला आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सर्वप्रथम धूर बाहेर पडताना दिसून आल्याने आगीची घटना समोर आली. आग एवढी भीषण होती की, अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.

या हॉटेलच्या बाजूलाच लोकमान्य टिळक शाळा आहे. मात्र सुदैवाने अजूनपर्यंत आग तिथपर्यंत पोहोचली नाही. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले आहे. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आग शॉर्टसर्किटने लागली की अति उष्णतेमुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.

Back to top button