भंडारा : प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्‍या | पुढारी

भंडारा : प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्‍या

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : तुमसर शहरातील दि. १२ एप्रिल रोजी झालेल्या मोनू विणू गेडाम या तरुणाच्या हत्येप्रकरणी तपासअंती पाच आरोपींना अटक करण्यात आले आहे. या आरोपींमध्ये दोघे मुख्य तर तिघे विधीसंघर्ष बालके आहेत.

पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तुमसर शहरातील माकडे नगर येथे टॅटूच्या दुकानासमोर बसलेल्या मोनू गेडाम याच्यावर ५ अज्ञात तरुणांनी वार केला. यामध्ये त्‍यांनी मिरची पावडर टाकून त्याच्या गळ्यावर शस्त्राने वार केले होते. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान पोलिसांचे पथके विविध ठिकाणी जावून तपासा केला असता, काही तासातच आरोपींना गजाआड करण्यात आले.

प्रेमप्रकरणातून केली हत्या

दरम्‍यान, वॉर्डातील मुलीशी बोलण्यावरून व प्रेमप्रकरणाच्या कारणावरून मोनूची हत्या करण्यात आली आहे. मोनू हा रोशन भजने याची हत्या करु शकतो, अशी भीती रोशनला होती. याच भितीमुळे रोशनने त्याच्या चार मित्रांच्या सोबतीने मोनूची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button