वाशिम : जिल्हा रुग्णालयातील मेसमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या | पुढारी

वाशिम : जिल्हा रुग्णालयातील मेसमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या

वाशिम, पुढारी ऑनलाईन : जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी एक मेस चालविली जाते. या मेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराने स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली आहे. वासुदेव शालीकराम पाटील  (वय-३०) असे गळफास घेणाऱ्या युवकाचे नाव आहे.

आज सकाळी गळफास लावून वासुदेवनं स्वतःचं जीवन संपविलं. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक हा वाशिम जिल्ह्यातील गुंज येथील रहिवासी असून वाशिम शहर पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

वासुदेव हा कामगार म्हणून मेसमध्ये काम करत होता. आज सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस घटनास्थळी हजर झाले. वासुदेव हा गुंज येथील मूळचा रहिवासी आहे.

याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. गावातून स्वतःचा त्याच्या परिवाराचा उदर निर्वाहाकरिता तो शहरात आला होता. मेसमध्ये काम करून पोट भरत होता. अशात त्याने आत्महत्या केल्यानं त्याच्या कुटुंबियांना धक्काच बसला. परंतु, घरगुती वादातून ही आत्महत्या केली असावी, असा प्राथिमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button