इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या तीन जणांना सीबीआयने ठोकल्‍या बेडया | पुढारी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या तीन जणांना सीबीआयने ठोकल्‍या बेडया

नागपुर, पुढारी वृत्तसेवा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे किरकोळ विक्री विभागाचे महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यांनी पेट्रोलपंप चालकाकडून एक लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी त्‍यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले. तसेच त्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार,  एन. पी. रोडगे, मुख्य व्यवस्थापक मनीष नंदेले, गोंदिया क्षेत्राचे विक्री व्यवस्थापक सुनील गोलार असे लाच घेतलेल्‍या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन अधिकाऱ्यांनी गोंदियातील दोन पेट्रोल पंप चालकांकडे मालकीहक्क हस्तांतरणासाठी पैशांची मागणी केली होती. ऑपरेटरने याची तक्रार सीबीआय नागपूर यूनिटकडे केली. त्यानंतर सीबीआयने सापळा रचून त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

दरम्‍यान,  मदासपेठ येथील आयओसी कार्यालयात सीबीआयने बुधवारी झडती घेतली. या झडतीमध्ये रोडगे यांच्या मुंबई व नागपुरातील फ्लॅट, तीन वेगवेगळय़ा बँकेत लॉकर तसेच काही कागदपत्रे सापडले. तसेच या अधिकाऱ्यांना सीबीआयने लाच घेताना अटक केली. या प्रकरणात रक्कमेची जुळवाजुळव करणारा नागपुरातील एक वकील सीबीआयच्या रडारवर होता. सीबीआयने या वकीलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.  त्‍यानंतर बुधवारी त्याला आयओसी कार्यालयात नेण्यात आले. दरम्‍यान सीबीआयने तीन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा  

Back to top button