गोंदिया : पैशाच्‍या वादातून तरुणाचा खून | पुढारी

गोंदिया : पैशाच्‍या वादातून तरुणाचा खून

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया शहरात एका १९ वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करून हत्या (murder) करण्यात आली. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोहित उर्फ डायमंड डोंगरे (वय १९, रा. कटंगी टोला, बुद्धविहार, गोंदिया ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्‍यान, प्राथमिक तपासात  पैश्याच्या वादातून हा खून झाल्‍याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, मृतक रोहित डोगरे हा गोंदिया शहराच्या अंगूर बगीचा भागात राहतो. रविवारी रात्रीपासून तो घरातून बेपत्ता झाला होता. आज (सोमवार) सकाळी घराजवळ असलेल्या एका मैदानावर रोहितचा मृतदेह (murder )आढळून आला.  रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोंदिया पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी जाऊन तपासाच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. रोहित डोगरे गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासात  पैश्याच्या वादातून हा खून झाल्‍याचे निष्पन्न झाले असून रामनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

 

 

 

Back to top button