तापमानाने उच्चांक गाठला, अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी | पुढारी

तापमानाने उच्चांक गाठला, अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : गत दोन दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच बुधवारी (दि.२३ ) धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथील एका ७५ वर्षीय वृद्धाचा नूतन चौकात आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. उष्माघाताचा बळी असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उन्हामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अंगातून घामाच्या धारा वाहताहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट आहे. उन्हाच्या तडाख्यापुढे पंखे व कूलर्सदेखील प्रभावहीन ठरत आहेत. सायंकाळी व उशिरा रात्रीपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. दरम्यान तालुक्यातील वसाड येथील विठ्ठल कोहळे हे कामानिमित्त धामणगाव शहरात बुधवारी सकाळी आले होते.

ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नूतन चौकाजवळ मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती दत्तापुर पोलिसांना देण्यात आली होती. दत्तापुर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विजयसिंह बघेल घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. मृतकाच्या कुटुंबियांना घटनेची सूचना देण्यात आली. उष्माघाताचा बळी असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button