अकोला : औष्णिक विद्युत प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याची मागणी | पुढारी

अकोला : औष्णिक विद्युत प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याची मागणी

अकोला, पुढारी ऑनलाईन :   महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प न करता औष्णिक विद्युत प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याची मागणी ऊर्जा मंत्री (Minister of Energy) नामदार नितीन राऊत (Nitin Raut)  यांच्याकडे लावून धरली होती. ऊर्जा मंत्र्यांनी यासंदर्भात मंत्रालयात 1 फेब्रुवारी रोजी एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांनी दिली.

प्रवीण भोटकर यांनी बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या पारस औष्णिक विद्युत (Thermal electricity) प्रकल्पाचे विस्तारीकरण करावे यासाठी ऊर्जा मंत्र्यांना निवेदन दिले होते. ऊर्जा मंत्र्यांनी प्रवीण भोटकर यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाची दखल घेऊन पारस प्रकल्पाचा प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे सूतोवाच केले आहे.

उर्जामंत्र्यांनी 1 फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील दालनात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला बाळापूर चे आमदार नितीन देशमुख, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांना निमंत्रित करण्यात आले असून प्रशासनातर्फे ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा व्यवस्थापकीय संचालक महापारेशन, मंत्रालयातील ऊर्जा विभागाचे संबंधित सहसचिव व उपसचिव,महानिर्मिती व महावितरण चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीकडे पारस येथील प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि बेरोजगार यांच्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button