नागपूर : 'मेडिकल'मधील ७६ निवासी डॉक्टर कोरोना बाधित - पुढारी

नागपूर : 'मेडिकल'मधील ७६ निवासी डॉक्टर कोरोना बाधित

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : मेडिकलमधील सुमारे ७६ निवासी डॉक्टर कोरोना बाधित आढळल्‍याने खळबळ माजली आहे. यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मेडिकलमधील निवासी डाॅक्टरांनी अनन्य साधारण कामगिरी बजावली. संपूर्ण नागपूरचा कोरोना रुग्णांचा भार मेयो व मेडीकल येथील निवासी डॉक्टरांवरच आहे. कोरोनाची तिसरी लाटही सौम्य आहे. निवासी डॉक्टर रुग्ण सेवा देत आहे.

नागपूर मध्ये रुग्णांना सेवा देत असताना अनेक निवासी डॉक्टर कोरोना बाधित होत आहे. मेडिकलमध्ये गेल्या १० दिवसांपासून सुमारे ७६ विविध विभागाचे निवासी डॉक्टर पॉझिटीव्ह आले आहे. सर्व निवासी डॉक्टर हे सौम्य लक्षणे असणारे आहे.

यातील २२ डॉक्टर बरे होऊन परत सेवेवर रूजू झाले आहेत. २ डॉक्टर सध्या अॅडमिट असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ५२ डॉक्टर गृहविलगीकरणात असून काही घरी व काही शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विलगीकरण व्यवस्थेत राहत आहे.

रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी योग्य प्रकारे कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले तर डॉक्टर कोरोना बाधित होण्यापासून वाचतील. हे लक्षात घेता रूग्णांच्या नातेवाईकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जीएमसी मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांनी केले आहे.

Back to top button