Nagpur Crime : प्रियकराच्या फ्लॅटवर जाऊन प्रेयसीने केले प्रियकरावर चाकूने वार - पुढारी

Nagpur Crime : प्रियकराच्या फ्लॅटवर जाऊन प्रेयसीने केले प्रियकरावर चाकूने वार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : दीड वर्षांपासून प्रेम संबंध असूनही लग्न करण्यास तयार होत नाही या रागातून प्रेयसीने आपल्याच प्रियकराला चाकूने गंभीर जखमी केले आहे. ही घटना नागपूर जिल्हातील वाडी येथे घडली आहे. हल्लेखोर प्रेयसी ही ३२ वर्षाची असून तिचा प्रियकर हा २५ वर्षाचा आहे. (Nagpur Crime)

यांचे गेल्या दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते. प्रेयसी ही प्रियकरावर लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे प्रियकर सध्या लग्नास इच्छुक नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते.

Nagpur Crime : माझासोबत लग्न केले नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील

काही दिवसांपूर्वी प्रेयसीने प्रियकराच्या आईला फोन करून त्याने माझ्यासोबत मैत्री तोडली असून त्याने माझासोबत लग्न केले नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली होती.

काल संध्याकाळी संतापलेल्या प्रेयसीने दत्तवाडी परिसरात प्रियकर राहत असलेल्या फ्लॅटवर जावून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे

प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर, गालावर, मनगटावर, मांडी आणि पाठीवर चाकुने वार केले आहेत. जिवाच्या आकांताने ओरडत एक किलोमीटरपर्यंत जखमी अवस्थेतच प्रियकर पळत गेला. स्थानिकांनी जखमी प्रियकराला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

परंतु, त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, प्रेयसीला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर यांनी दिली आहे.

Back to top button