भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनारक्षित झालेल्या जागांसाठी आज मतदान | पुढारी

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनारक्षित झालेल्या जागांसाठी आज मतदान

भंडारा/गोंदिया : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात १३ जिल्हा परिषद गट व २५ पंचायत समिती गणाकरीता आज मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील या मतदानासाठी ३ लाख ६७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उद्या १९ रोजी मतमोजणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने अनारक्षित झालेल्या जागांसाठी हे मतदान घेतले जात आहे. जिल्हा परिषदेच्या १३ गटातील तर पंचायत समितीच्या २५ गणासाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात आहेत. अशा एकूण ३८ जागांसाठी १९८ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानात २१ डिसेंबर रोजी ७०.३३ टक्के मतदान झाले होते.
दुसऱ्या टप्प्यातील ६०१ मतदान केंद्रावर होणाऱ्या या मतदानात १ लाख ८५ हजार ७१५ पुरूष व १ लाख ८१ हजार ७९३ स्त्री मतदार उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करतील.

प्रशासनाने मतदानासाठी सुटीचे व अन्य खासगी आस्थापनांनी मतदानासाठी दोन तास सवलत देण्याबाबतही निर्देश दिले आहेत.

गोंदियात १३१ उमेदवार रिंगणात

गोंदिया जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत १३१ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भाग्य ईव्हीएम बंद होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात म्हणजे, २१ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी तसेच पंचायत समितीच्या ८६ गणासाठी निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, ओबीसींच्या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्याने दुसºया टप्प्यात मंगळवारी (ता. १८) ही निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी ५१, तर पंचायत समिती गणासाठी ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button