श्रीवर्धन : तालुक्यातील शेखाडी येथील समुद्र किनार्यालगत कासवकडा परिसरात 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बेवारस मृतदेह आढळून आला.
श्रीवर्धन पोलीस ठाणे येथून मिळालेल्या माहितीनुसार सदरची मृत व्यक्ती अंदाजे पस्तीस ते चाळीस वयोगटातील आहे. मृतदेहाची अवस्था बघता सहा ते सात दिवसांपूर्वी सदरची व्यक्ती मृत झालेली असावी. ही व्यक्ती समुद्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेली असावी परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मयत झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची खबर शेखाडी उपसरपंच प्रमोद धाडवे यांनी दिली असून श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.