ठाणे : पुढारी वृत्तसेवा
आमदार प्रताप सरनाईक आणि माझी नगरसेवक पूर्वेस प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वर्तक नगर येथील दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात नऊ थर रचत ठाणेकरांना थरांच्या थरथराटाचा अनुभव दिला.
२९ वर्षे दहीहंडीची परंपरा जपणारी, विश्वविक्रम घडवण्यासाठी प्रसिद्ध असणारी, ठाण्यातील मानाची समजल्या जाणाऱ्या संस्कृतीची दहीहंडीत राज्यभरातून गोविंदा पथकं सहभागी होत असतात. सकाळपासूनच संस्कृती प्रतिष्ठान येथे गोविंदांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात मुंबईच्या कोकणनगर गोविंदा पथकाने मागील अनेक वर्षांपासून आतापर्यंत अनेक बक्षिसं जिंकली आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात या पथकाने सर्वात आधी नऊ थरांची सलामी दिली आहे. त्यानंतर ते १० थर लावणार असल्याचं बोललं जात आहे.