बदलापूर : बदलापुरात एका अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले असून नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नरेश ऊर्फ नागेश दांडे असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 31 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बदलापुरात बांधकामाच्या ठिकाणी काम करणार्या कुटुंबातील चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता.