बदलापूर: पुढारी वृत्तसेवा : बदलापूर शाळेतील अत्याचारप्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झालेल्या मृत्यूनंतर बदलापुरात ज्या महिला आंदोलकांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी एकमेकींना पेढे भरून जल्लोष साजरा केला. बदलापूरकरांच्या मनात असलेल्या असंतोष आणि खदखद गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. पण अक्षय शिंदे यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी बेलवली परिसरात एकत्र जमून एकमेकींना पेढे भरून आनंद साजरा केला. (Akshay Shinde death)
बदलापूरकरांच्या मनात या प्रकरणानंतर प्रचंड चीड होती. आणि आरोपीला तत्काळ फाशीची मागणी आम्ही करत होतो. मात्र, नराधम शिंदेचा झालेल्या मृत्यूनंतर आम्ही अत्यंत समाधानी असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रियांका दामले यांनी सांगितले. अनेक महिलांनी एकत्र येऊन या नराधम शिंदे यांच्या मृत्यूनंतर जल्लोष साजरा केला. यावेळेस मनसेच्या माजी महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनीही आनंद व्यक्त करत या प्रकरणात दोषी असलेल्या इतर आरोपींनाही शिक्षा देण्याचे मागणी लावून धरली आहे. (Akshay Shinde death)