वडील भेटून गेले अन् त्यानंतर अर्ध्या तासांत खेळ खल्लास! अक्षय शिंदेचा कसा झाला एन्काऊंटर?

Akshay Shinde Encounter | आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर झाडल्या गोळ्या
Akshay Shinde Encounter
बदलापूरच्या नराधम आरोपीचा एन्काऊंटरfile phto
Published on
Updated on

ठाणे : बदलापूरच्या (Badlapur) शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, यातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसाकडील रिव्हॉल्व्हर हिसकावले असता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यामध्ये अक्षयचा (Akshay Shinde) मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एक पोलिस अधिकारीही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हा प्रकार म्हणजे आत्महत्या की एन्काऊंटर, असा मुद्दा चर्चिला जात आहे. तसेच, या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत.

ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाकडे आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिस पथक तळोजा कारागृहात धडकले आणि आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याला घेऊन ठाण्याकडे निघालेे होते. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास टोल नाक्याच्या आसपास आरोपी अक्षय शिंदे याने सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची पिस्तूल हिसकावून घेत तीन राऊंड फायर केले. दोन फायर हवेत झाडले, तर एक गोळी मोरे यांच्या पायावर लागली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी बरोबर अक्षयच्या डोक्याला लागली, तर दुसरी अन्यत्र लागली. त्याला कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. अक्षयने झाडलेली गोळी मात्र एपीआय नीलेश मोरेंच्या पायाला लागली. त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आधी अक्षयने आत्महत्या केल्याची बातमी पसरली. पाठोपाठ हे पोलिसांचेच एन्काऊंटर असल्याचे सांगितले जाऊ लागले. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. हा आत्मरक्षणाच्या नावाखाली केलेला एन्काऊंटर आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. मृत अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनीही पोलिसांवर गंभीर आरोप करीत आमच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे म्हटले आहे.

पोलीस उपायुक्त करणार चौकशी

अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या या संशयास्पद एन्काऊंटरची (Akshay Shinde Encounter) चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिस उपायुक्त (अर्थ गुन्हे विभाग) पराग मनेरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कोण आहे अक्षय शिंदे?

चोवीस वर्षीय अक्षय (Akshay Shinde) बदलापूरला शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता... शाळेत स्वच्छता ठेवण्याबरोबर मुलांना वॉशरूमला घेऊन जाण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते... अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

वडील भेटून गेले ते शेवटचे

अक्षय शिंदे याच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलिसांचे पथक सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास तळोजा रुग्णालयात पोहोचले. तत्पूर्वी, 5 वाजण्याच्या सुमारास अक्षय शिंदे याला त्याचे वडील भेटून गेलेले होते. 5.30 वाजता गुन्हे शाखा पोलिस अक्षय शिंदे यांनी त्याचा ताबा घेतला. ठाण्याकडे येताना मुंब्रा बायपासवर हा सनसनाटी प्रकार घडला.

नेमके काय घडले?

  • तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घडली घटना

  • मुंब्रा बायपासजवळून जात असताना आरोपी अक्षय याने एपीआय नीलेश मोरेंकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचले

  • नीलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या

  • यातील एक गोळी नीलेश मोरेंच्या पायाला लागली

  • दोन गोळ्या झाडताना नेम चुकला

  • सोबत असलेल्या पथकातील एका पोलिस अधिकार्‍याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला

  • एपीआय नीलेश मोरे यांची प्रकृती गंभीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news