बदलापूर : बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची अखेर ओळख परेड झाली. कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ठ रूम मध्ये ही ओळख परेड पार पडली. विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती. मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआटीने न्यायालयात आरोपीच्या ओळख परेडसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार ही परवानगी मिळाल्यानंतर ही ओळख परेड पार पडली. दरम्यान या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेची झालेली ओळख परेड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.ही ओळख परेड होताना न्यायाधीश, त्यांच्यासह महसूल विभागातील उच्च पदस्थ अधिकारी व तीन पंचा समक्ष ही ओळख पर्यटन झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(Badlapur Rape Case)
ओळख परेडमध्ये मुलीने नराधमाला ओळखल्यामुळे या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे विरोधात कायदेशिररित्या एक महत्त्वपूर्ण टप्पा एसटीने गाठल्याच बोललं जात आहे. बदलापुरातील शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरकरांचा आक्रोश साऱ्या देशाने पाहिला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या आरोपीच्या अटकेनंतर आंदोलकांच्या मागणी मान्य करण्यासाठी राज्य शासनाने एसआयटी स्थापन केली होती. त्या एसआयटीने आता तपासला चारही बाजूने दिशा देऊन आरोपी अक्षय शिंदे विरोधात भक्कम पुरावे कोर्टात सादर करण्याचे हेतूने त्याची ओळख परेड होण्याची मागणी कोर्टाला केली होती. त्यानुसार ही ओळख परेड झाल्यामुळे व आरोपीला ओळखल्यामुळे या प्रकरणात आता आरोपी विरोधात भक्कम पुरावा तयार झाला आहे.(Badlapur Rape Case )