

कोकणात एकूण ३९ विधानसभा मतदारसंघ येतात. यात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी दुरंगी सामना अपेक्षित होता. मात्र, बंडखोरांमुळे तिरंगी चुरस निर्माण झालेल्या मतदारसंघांची संख्या नऊवर गेली आहे. आघाडी आणि महायुती या समीकरणांमुळे ही बंडखोरी अनिवार्य ठरल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती आणि जागा मर्यादित होत्या. त्यामुळे सर्वांना खूश करणे एकावेळी शक्य नव्हते. त्यामुळे बंडखोरांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीत शरद पवार गटाच्या अर्चना घारे यांनी या मतदारसंघात्त महायुतीचे दीपक केसरकर पांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे राजन तेली यांच्यात थेट लढत आहे; परंतु पारे रिंगणात कायम राहिल्यास महाविकास आघाडीची मते कमी होऊ शकतात.
ठाण्यातील मिरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार गौता जैन यांनी भाज्यात प्रवेश केला होता, मागच्या वेळी त्यांनी नरेंद्र मेहता यांचा पराभव केला
होता. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी बंद केले आहे, नरेंद्र मेहता हे भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मुजफ्फर हुसेन रिंगणात आहेत.
कल्याण पश्चिामध्ये शिंदे गटाचे चे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर
यांच्याविरोधात टाकरेंच्या शिवसेनेचे सचिन बासरे परे यांना उमेदवारी दिली
होती. या दुरंगी लढतीत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उही घेतली आहे. यामुळे येथे तिरंगी पुरस निर्माण झाली आहे. येथेही नरेंद्र पवारांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपच्या सुलभा गायकवाड रिंगणात आहेत.
ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे हे रिंगणात आहेत. या मतदारसंघात दुहेरी बंडखोरी आहे. शिंदे गटाचे महेश गायकवाड व कॉग्रेसचे सचिन पोटे हे रिंगणात
उत्तरले आहेत. भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचे पती गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच केलेला गोळीबार यामुळे दोघांमध्ये विळ्या-भोपळ्याने गैर आहे.
वार्जतमध्ये शिंदे देगाचे विद्यमान आमदार आहेत महेंद थोरवे
त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून नितीन सावंत रिंगणात आहेत.
मात्र येथे अजित पवार गटाचे सुधाकर पारे यांनी बंडखोरी केली आहे.
ऐरोली मतदारसंघात भाजपकडून गणेश नाईक रिंगणात आहेत,
महाविकास आघाडीकडून एम. के. मडवी रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी बंडखोरी केली आहे. चौगुलेही ताकदवान उमेदवार असल्याने येथेही तिरंगी चुरस होण्याची शक्यता आहे.
पालचरमधील विक्रमगड मतदारसंघात शरद पवार गटाचे सुनील भुसारा है विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात हरिचंद्र भोये यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिंदे गटाचे नेते प्रकाश निकम हे रिंगणात उतरले आहेत. यामुळे येथेही तिरंगी लढत होणार आहे.
पोईसर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत. वा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉ. विश्वास बळची रिंगणात उतरले आहेत. शिंदेंख्या शिवसेनेकडून भाजपातून आयात केलेले विलास तरे रिंगणात उतरले आहेत. शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार जगदीश घोडी यांनी बंडाचे निशाण रोवले आहे.
नववा मतदारसंघ आहे तो कोपरी पानपाखाडी. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिने अशी लढत होत असताना काँग्रेसरुया मनोज शिंदे यांनी अर्ज भरत महाविकास आघाडीत बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार आहे.