कल्याणच्या गांधारीत अवतरला अजस्त्र अजगर, शतपावलीसाठी आलेल्यांची उडाली भीतीने गाळण

सर्पमित्रांनी घेतले ताब्‍यात, लवकरच निसर्गमुक्त करणार
A large python was found in Kalyan's Gandhari
कल्याणच्या गांधारीत अवतरला अजस्त्र अजगरFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण जवळच्या गांधारी परिसरात झालेल्या नवीन रस्त्यावर (रविवार) रात्रीच्या सुमारास अजस्त्र अजगर फिरताना आढळून आला. अजगराला पाहताच शतपावली करायला आलेल्या बघ्यांची भीतीने गाळण उडाली. मात्र सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून 13.50 किलो वजनाचा आणि 10 फूट लांबीच्या या अजगराला जेरबंद केल्याने जमलेल्या साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पूर्वी कल्याण जवळच्या ग्रामीण भागात मोठी वन संपदा होती. मात्र आता या परिसरात गृहसंकुलांचे प्रकल्प वाढले आहेत. परिणामी वनचरांचे अतिस्तव यामुळे धोक्यात आले आहे. याच परिसरातील मोठी वनसंपदा नष्ट झाल्याने आता या परिसरातील लहान-मोठे साप देखील वर्दळीच्या जागी दिसू लागले आहेत. अशातच गांधारी झालेल्या नवीन रस्त्यावर रात्री चक्क 10 फूट लांबीचा अजगर फिरताना आढळून आला. नव्याने झालेल्या या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अनेक रहिवासी जेवणानंतर शतपावली करत असतात. या रस्त्याच्या डिव्हायडरला लागून भला मोठा अजगर फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली.

त्यातील कुणीतरी वॉर फाऊंडेशनचे प्राणीमित्र प्रेम आहेर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच प्रेम आहेर हे योगेश कांबळे, मंदार सावंत, विनायक पवार, अनुराग लोंढे आणि तन्मय माने यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. या अजगराला सुरक्षित पकडून पिशवीत बंद केले. हा अजगर पूर्णपणे बिनविषारी असून, त्याच्यापासून मानवाला कोणताही धोका नाही. जेरबंद केलेला हा अजगर वनविभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच योग्य ठिकाणी निसर्गमुक्त करण्यात येईल, असे सर्पमित्र प्रेम आहेर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news