ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या : मानपाडा पोलिसांची कारवाई - पुढारी

ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या : मानपाडा पोलिसांची कारवाई

डोंबिवली – पुढारी वृत्तसेवा
ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण पैशांच्या देवाणघेवाणीतून वादातून अपहरण करणाऱ्या आरोपीसह त्याच्या मित्रांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश येथील मनजीत यादव, धनंजय यादव, सोमप्रकाश यादव असे अटक केलेल्‍या संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्व अंदाजे वय २५ ते ३० वयोगटातील आहेत.

मनजीत हा बेलापूर येथील शिपिंगचा व्यवसाय करत होता. त्याआधी मनजीत यादव आणि सुभाशिष बॅनर्जी हे एका ठिकाणी एजंट म्हणून काम करत असताना त्यांच्यात पैशांच्या हिशोबावरून वाद झाले होते. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी बॅनर्जी यांचे अपहरण झाल्याची फिर्याद बॅनर्जी यांच्या पत्नीने दिली होती. पाच लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या वडिलांना ठार मारू, असा फोन बॅनर्जी यांच्या मुलीला आला होता. याच फोनचा आधार घेत बॅनर्जी यांना विविध ठिकाणी लपवणाऱ्या मनजीत यादव आणि सहकारी याला नालासोपारा येथील एका खाजगी लॉजमधून मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपयुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांचे सहकारी दत्तात्रय सानप, सुनील तारमळे, प्रशांत वानखेडे आणि इतर सहकाऱ्यांनी या खटल्याचा उलगडा केला.

हेही वाचलं का? 

Back to top button